धक्कादायक; बुलढाण्यात १५ वर्षीय विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल ! पहाटे लवकर उठली अन्..

 
Bbvc
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलडाणा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. १५ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना आज १० जुलै रोजी पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास घडली. प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 
प्राप्त माहितीनुसार, शहरातील चैतन्यवाडी भागातील रहिवासी कोमल संदीप सुसर (१५वर्ष) असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे. कोमल सुसर हे मूळची शिरपूरची आहे. परंतु शिक्षणाच्या कारणास्तव कोमल आपल्या आई-वडिलांसह बुलढाण्यात राहत होती. स्थानिक एडेड हायस्कूलमध्ये दहाव्या वर्गात शिकत असून तिने खाजगी शिकवणी वर्ग देखील लावले होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच झालेल्या शिकवणी वर्गात तिला कमी गुण मिळाले होते. यातून ती नैराश्यात असल्याचे बोलले जात आहे. आज १० जुलै रोजी कोमल ही पहाटे साडेपाचच्या सुमारासच झोपेतून उठली. बाथरूमला जाते असे सांगत ती खोली बाहेर पडली. परंतु बराच वेळ निघून गेला तरी कोमल परतली नव्हती. तिच्या आई-वडिलांनी परिसरात तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांनतर धक्कादायक बाब अशी की, घरासमोर असलेल्या वाड्यातील विहिरीमध्ये कोमलने आत्महत्या केल्याचे समजले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.