धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून उकळले दोन लाख, जमीन बळकावण्यासाठी मुलांना चिरडण्याची धमकी! खामगावात पती-पत्नी विरुध्द गुन्हा..

 
Pspom
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मागील काही दिवसांपूर्वी खामगाव शहरात ३६ पेक्षा अधिक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, याप्रकरणी एका मुलाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनतर दुसरा गुन्हा खामगाव शहर पोलीस ठाण्यात रविवारी दाखल झाला आहे. यामध्ये एका पती पत्नीने हा किळसवाणा प्रकार केल्याचे गुन्ह्यातून उघडकीस आले आहे. झाले असे की, ओळखीतून पिडीत महिलेच्या मोबाईल मधून तिच्या मित्रासोबतचे अश्लील व्हिडिओ घेतले आणि व्हायरल करण्याची धमकी देत पती-पत्नीने दोन लाख रुपये उकळले. इतकच नाही तर, जमीन बळकवण्यासाठी पती-पत्नीने पिडीतेच्या दोन्ही मुलांना ट्रक खाली चिरडून मारण्याची धमकी देखील दिली. पीडितेच्या तक्रारीवरून रविवारी, शहर पोलीस ठाण्यात पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 
    दिलेल्या तक्रारीत पिडीत महिलेने म्हटले आहे की, शहरातील एका वस्तीतील पीडित महिलेशी असलेल्या ओळखीतून एका महिलेने तिचे मित्र सोबतचे अश्लील व्हिडिओ मोबाईल मध्ये घेतले. काही दिवसानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ओळखीतील महिलेने आणि तिच्या पतीने पिडीतेकडून जून २०२२ मध्ये दोन लाख रुपये उकळले. पैसे दिल्यानंतर आरोपींनी व्हिडिओ डिलीट केल्याचे पिडीतेला सांगितले होते. परंतु इतक्यावरच न थांबता, दोघा पती-पत्नींनी पीडित महिलेला तिच्या नावावर असलेली दोन एकर जमीन देण्याची सांगितली. त्यांनतर ४ मे, रोजी पिडीतेला रस्त्यात अडवून आरोपी म्हणाले की, जमीन न दिल्यास दोन्ही मुलांना ट्रॅकखाली चिरडून ठार मारू. पिडीतेने जमीन देण्यास नकार दिला, म्हणून आरोपींनी तिचे व्हिडिओ व्हायरल केले. असे पिडीतेने तक्रारीत म्हटले आहे.