धक्कादायक ; रात्री जेवण करून सगळे कुटुंब एकत्र झोपले, मध्यरात्री मोठी मुलगी झाली गायब ! रात्रभर शोधली पण.. कुणीतरी पळवून नेल्याचा वडिलांचा आरोप..

 
चिखली
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) चिखली तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी रातोरात गायब झाली. कुटूबियांनी शोधून सुद्धा मिळून न आल्याने तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. कोणीतरी अज्ञाताने पळवून नेल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.
घटना १२ जून रोजीची आहे. फिर्यादी वडील यांना दोन मुले व तीन मुली आहेत. रात्री जेवण झाल्यानंतर सगळे कुटुंब एकत्र झोपले. दरम्यान, मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घरातील लाईट गेल्यामुळे त्यांना जाग आली. यावेळी मोठी मुलगी घरात दिसली नाही. त्यांनी त्यांच्या पत्नीला उठविले, बाकी मुलांना देखील जागी केले. मोठी मुलगी नजरेत पडत नसल्याने सगळ्यांना चिंता सुरू झाली. घराच्या परिसरात आणि बाहेर तिचा शोध सुरू झाला. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत मुलीला शोधण्यात आले. तरी देखील ती मिळाली नाही. अखेर वडिलांनी चिखली पोलीस ठाणे गाठून सगळी हकीगत सांगितली. कुणीतरी अज्ञाताने मुलीला रातोरात पळवून नेले असा संशय वडिलांनी तक्रारीद्वारे केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.