धक्कादायक ! नवऱ्याची बायकोला बेदम मारहाण; बायकोचा उपचारा दरम्यान मृत्यू ! देऊळघाट येथील घटना..

 
देऊळघाट ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) देऊलघाट येथून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवऱ्याने मारहाण केल्यामुळे दवाखान्यात भरती असलेल्या महिलेचा  मृत्यू झाला आहे. प्रकरणी मृतक महिलेच्या भावाने ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली त्यावरून मोसिन खान मोबिन खान रा. देऊळघाट याच्या विरोधात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्सा परवीन असे मृतक महिलेचे नाव आहे. त्यांचे भाऊ शेख समीर शेख खाजा यांनी  ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, बारा वर्षांपूर्वी त्यांची बहिण अक्सा परवीन यांचा विवाह देऊळघाट येथीलच मोसिन खान मोबिन खान याच्याशी झाला होता. तो नेहमी किरकोळ  कारणांवरून घरी वाद करायचा आणि पत्नी अक्सा परवीन यांना मारझोड करायचा. १३ मे रोजी दुपारी,  शेख समीर यांना आरोपी मोसिन खान याचा फोन आला.

त्यावेळी त्याने सांगितले की, बहिण अक्सा परवीन हीला बुलढाण्यातील मल्टीस्पेशालिटी दवाखान्यात भरती केले आहे. त्यांनतर शेख समीर यांनी हॉस्पिटल गाठून बहिणीची विचारपूस केली. तेव्हा किरकोळ कारणावरून वाद होऊन मारहाण झाली , चाप्टा बुक्यांनी पोटात मारहाण झाल्याने पोट दुखत आहे, पोटाच्या आत गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याचे त्यांना बहिण अक्सा परवीन यांनी सांगितले. दरम्यान, काल सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास उपचार सुरू असतानाच अक्सा परवीन यांचे निधन झाले. तत्पूर्वी  आरोपी मोसिन खान याने सांगितले होते की " जर तुम्ही तक्रार दिली तर, मी तुझ्या बहिणीला वागवणार नाही व जीवनी मारून टाकीन" असे तक्रारीत म्हटले आहे.  दरम्यान अंत्यविधी झाल्यानंतर मृतक महिलेचे भाऊ शेख समीर यांनी तक्रार दिली प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मोसिन खान याच्याविरुद्ध काल रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून पुढील पंचनाम्यासाठी पोलीस देऊळघाट येथे गेले आहेत.