धक्कादायक! देशात, राज्यात, बुलढाण्यात महिला सुरक्षिततेचे वाभाडे ? मोताळ्यात चुकीचे घडले!

 
Borakhedi

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) डॉक्टर महिला आणि दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असून, महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असताना, जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग झाला. इतकेच नाही तर, घटनेच्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. २० ऑगस्ट रोजी झालेल्या घटनेतील आरोपी बोराखडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

   बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावात हा घृणास्पद प्रकार घडला आहे. पिडीत महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना विठ्ठल पन्हाळे याने पाठलाग केला. एका हॉटेल जवळ येवून त्याने वाईट उद्देशाने इशारे केले. यांनतर पिडीतेचा विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, याप्रकारानंतर विठ्ठल पन्हाळे याचा सहकारी रवि पन्हाळे याने महिलेच्या नातेवाईकाला धारदार शस्त्राने मारहाण केली. तक्रारीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.