धक्कादायक! विहिरीत बुडून विवाहितेचा मृत्यू; आत्महत्या की घातपात? लोणार तालुक्यातील वीरपांग्रा येथील घटना.

 
Crime
बिबी(जयजित आडे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार तालुक्यातील वीरपांग्रा गावात विहिरीत बुडून ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज, २१ डिसेंबरच्या पहाटे ही धक्कादायक घटना उघडकीस आली. मृतक महिलेचे नाव दुर्गा सुदाम खंड असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, आज सकाळी वीरपांग्रा शिवारात निवृत्ती डहाळके यांच्या शेता जवळील विहिरीमध्ये मृत महिलेचे शरीर तरंगताना आढळले. सदर बातमी गावकऱ्यांपर्यंत पोहचली. मात्र महिलेने आत्महत्या केली की हा घातपात आहे हे अद्याप कळू शकले नाही. त्यांच्या पश्चात पतीसह दोन मुले आहेत. याप्रकरणी बीबी पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनात किनगाव जट्टू बीटचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र बोरे करीत आहेत.