धक्कादायक! विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू; तमाशाचा फड उभारतांना लोखंडी पाईपचा झाला विजेचा तारांना स्पर्श..! मोताळा तालुक्यातील पान्हेरा खेडीच्या यात्रेत झाली दुर्घटना

 
Hdhx
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोताळा तालुक्यातील पान्हेरा खेडी येथील यात्रेत आज २२ नोव्हेंबरला भीषण दुर्घटना झाली. तमाशाचा फड उभा करीत असताना हातातील लोखंडी पाईपचा विजेचा तारांना स्पर्श झाल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाला. 
जळगाव येथील आनंद लोकनाट्य मंडळाचा तमाशा या यात्रेत होणार होता. त्याच्या फड उभारणीचे काम सुरू असताना दोन कर्मचाऱ्यांच्या हातातील लोखंडी पाईप वरून जाणाऱ्या विजेच्या तारांना लागले.या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. अंकुश भारुडे ( नारायणगाव, जि.पुणे) व विशाल भोसले (रा.राजूर, जि जालना) अशी मृतकांची नावे आहेत.घटनेची माहिती मिळताच धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतक मजुरांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे उत्साहात होणाऱ्या या यात्रेवर दुःखाचे सावट पसरले आहे.