धक्कादायक! मलकापुरात तिघांनी लुटली विवाहितेची इज्जत; चिखली तालुक्यातील विवाहितेला मलकापुरात नेऊन रात्रभर...

 
बोलावले..
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूरात अतिशय धक्कादायक अन् तेवढीच संतापजनक घटना घडली आहे. चिखली तालुक्यातील अमडापुर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका विवाहितेला मलकापूरात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ३ नराधमांनी एका खोलीत विवाहितेवर आळीपाळीने रात्रभर अत्याचार केला. पिडीत विवाहितेला नवऱ्याने सोडून दिल्याने तिची मानसिक अवस्था ठीक नाही, त्याचा गैरफायदा घेत आरोपी नराधमांनी पाप केले. मलकापूर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत विवाहिता चिखली तालुक्यातील एका गावची आहे. १९ मार्चला मेहकर तालुक्यातील विश्र्वी येथील सूरज पांडुरंग शेवाळे(३०) हा त्याच्या दुचाकीने आकाश संजय शेजुळ (२६) याच्यासोबत बुलडाणा येथे येत होता. त्यावेळी दोघांची पिडीत विवाहीतेसोबत भेट झाली. त्यानंतर त्यांनी तिला घेऊन मलकापूर गाठले. सुरुवातीला त्यांनी एका ठिकाणी मुक्काम करण्याचा प्रयत्न केला पण घरमालकाने त्यांना पळवून लावले.
  १९ मार्चला रात्री ९ वाजता त्यांनी चिखली येथील एका व्यक्तीशी फोनवरून संपर्क साधला. अडचण सांगून त्याच्या ओळखीने त्याने काही दिवसाआधी भाड्याने ठरवलेल्या खोलीत मुक्काम ठोकला..
दोघांनी तिसऱ्याला बोलावले..
दरम्यान दोघा आरोपींनी विशाल भगवान शेवाळे(३३) या त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला देखील बोलावले. रातभर तिघांनी विवाहितेवर आळीपाळीने बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी खोलीतून बाहेर पडत असताना घर मालक तिथे दाखल झाले. पिडीत विवाहितेची अवस्था पाहून त्यांना संशय आल्याने त्यांनी ओळखपत्र मागितले व त्याचे फोटो पोलिसांना पाठवले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर या प्रकाराचा उलगडा झाला. पिडीत विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दखल केला असून आरोपींना अटक केली आहे.