धक्कादायक! ट्युशनक्लास वरून घरी जाणाऱ्या मुलीला रस्त्यात अडवले अन् नको ते केले....खामगावच्या तरुणाचा काळा कारनामा..!

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. मुलींवर वाईट नजर टाकणाऱ्या भामट्यांना ती अल्पवयीन असल्याचेही भान राहत नाही. खामगाव शहरात एका २३ वर्षीय भामट्या तरुणाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर पापी नजर टाकली. विद्यार्थिनी ट्युशनक्लास वरून घरी जात असताना त्याने तिला रस्त्यात रडवले अन् नको ते केले..
प्राप्त माहितीनुसार अल्पवयीन विद्यार्थिनी सायंकाळी घरी जात होती. एका २२ वर्षीय भामट्याने तिचा पाठलाग केला. रस्त्यात अडवून तिला अश्लील इशारा केला. घाबरलेल्या विद्यार्थिनीने तिच्या वडिलांना ही बाब सांगितले. विद्यार्थिनीचे वडील संशयित तरुणाच्या घरी जाब विचारायला गेले,त्यावेळी तरुण आणि त्याच्या वडीलाने विद्यार्थिनीच्या वडिलांनाच शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात बापलेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.