धक्कादायक! कर्जाचा बोजा वाढला, शेतकरी पुत्राने टोकाचा निर्णय घेतला! अंत्री खेडेकर गावात हळहळ

 
Jfjnc
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या घटना सातत्याने घडत आहेत. आता खरीप हंगाम तोंडावर आला असताना चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील शेतकरी पुत्राने कर्जाच्या बोज्यापाई टोकाचा निर्णय घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. संजय नरहरी खेडेकर(३३) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आज,१६ मे रोजी मेरा बुद्रुक शिवारात ही घटना उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार मृतक संजय नरहरी खेडेकर यांच्यावर काही खाजगी पतसंस्थांचे , बचत गटाचे व फायनान्स कंपनीचे कर्ज आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे तोट्यात आलेली शेती, अल्प उत्पादन यामुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते. आज त्यांनी स्वतःच्या वडिलांच्या नावावर असलेल्या शेतातील निबांच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस स्टेशनचे कैलास उगले यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. महसूल विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून तपास अंढेरा पोलीस करीत आहेत.