धक्कादायक! १९ वर्षीय तरुणीने घेतला टोकाचा निर्णय; राहत्या घरात दोरीने गळफास! मोताळा तालुक्यातील घटना; आत्महत्येचे कारण...?

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोताळा तालुक्यातील कोऱ्हाळा बाजार गावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज २७ फेब्रुवारीच्या दुपारी १९ वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली
याप्रकरणी मुलीचे काका गजानन कडूबा ढोले यांनी धामणगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी मर्ग दाखल केला. थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार गजानन ढोले गुरांना चारा पाणी करण्याकरिता शेतात गेले असता त्यांना मुलगी भाग्यश्री हिचा फोन आला. ती म्हणाली, काका बाळू ढोले यांची मुलगी निकिता हिने घरामध्ये दोरीच्या साह्याने गळफास लावुन घेतल्याचे दिसत आहे. फोनवरून असे ऐकताच गजानन ढोले तातडीने घरी पोहचले. त्यांना सुद्धा ते दृश्य पाहून धक्का बसला. त्यांनतर गळफास काढून निकितला खाली उतरविले. त्यावेळी तिचा मृत्य झाल्याचे समजले. गजानन ढोले यांनी पोलीस ठाणे गाठून संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानुसार धामणगाव पोलिसांनी मर्ग दाखल केला.पुढील तपास पोहेकॉ शरद बाठे करत आहेत. दरम्यान निकिताने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही..मात्र तिने एवढा टोकाचा निर्णय का घेतला याबाबत विविध तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहे.