धक्कादायक! लोखंडी सळईने शिक्षिकेला मारहाण ; मोताळ्याची घटना..

 
  Cvjv
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) कोर्टात सुरू असलेली केस मागे घेण्यासाठी शिक्षिकेला मारहाण केल्याची घटना मोताळा येथे उघडकीस आली. या प्रकरणी पतीसह चार जणांवर बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 भारती भागेश पाटील असे शिक्षिकेचे नाव आहे. पाटील ह्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. मुक्ताईनगर येथे त्या राहतात. पतीसोबत पटत नसल्याने त्यांची कोर्टात केस सुरू आहे. केस मागे घेण्यासाठी भागेश भाऊराव पाटील, भाऊराव मापारी, ललिता मापारी, अश्विनी जवरे (सर्व रा. नाईक नगर मोताळा) यांनी शिक्षिकेला बोलावून घेतले. केस मागे घेण्याच्या कारणावरून भारती पाटील यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. लोखंडी सळईनेही त्यांना झोडपले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.