धक्कादायक! कॉलेजमागे नेऊन तरुणीवर लैंगिक अत्‍याचार

खामगाव शहरातील घटना
 
 
अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याचा दोनदा लैंगिक अत्याचार; पोलीस त्‍याला पकडायला गेले तेव्‍हा दिसले धक्कादायक दृश्य!!
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय तरुणीवर २५ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आज, २० नोव्हेंबर रोजी सकाळी सातला खामगाव शहरातील केला विद्यालयाच्या बाजूला, जनावरांच्या सरकारी दवाखान्यामागे निर्जनस्थळी घडली. पीडितेने खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव शहरातील फाटकपुरा भागातील तेलंगी वस्तीतील १७ वर्षीय तरुणी केला कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत  शिकते. मस्तान चौक परिसरात राहणाऱ्या व मिस्तरी काम करणाऱ्या इम्रान खान महेमूद खान (२५) याच्याशी ८-९ महिन्यांपूर्वी तिची ओळख झाली होती. इम्रान तिला सतत फोन व मेसेज करून भेटायचा आग्रह करत होता. आज सकाळी ७ वाजता पीडित तरुणी कॉलेजला गेली होती. तिथे आरोपी इम्रानसुद्धा पोहोचला. त्‍याने तिला सोबत चलण्याचा आग्रह धरला. तू सोबत आली नाहीस तर मी तुझी बदनामी करीन, अशी धमकी इम्रानने तिला दिली. बदनामीच्या भीतीने ती इम्रानसोबत कॉलेजच्या बाजूला असलेल्या जनावरांच्या सरकारी दवाखान्याच्या मागील निर्जनस्थळी गेली. तिथे इम्रानने जबरदस्ती तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडितेच्या आईने याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून इम्रानविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास ठाणेदार प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक पांडुरंग इंगळे, सहायक पोलीस निरिक्षक नीलेश सरदार करीत आहेत.