धक्कादायक! १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार! आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

 
Dghk
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर लैंगीक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीची आरोपीच्या ताब्यातून सुटका करण्यात आली असून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. काल,१५ ऑगस्ट रायपूर पोलिसांनी ही कारवाई केली.
  पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील एक गृहस्थ हे सैलानी येथे उपचार घेत होते. यावेळी त्यांची १४ वर्षीय मुलगी देखील त्यांच्यासोबत राहत होती. साडेचार महिन्यांपूर्वी या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते.त्यावेळी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. 
दरम्यान आरोपी हा हिंगोली जिल्ह्यातील करंजी येथे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. काल,१५ ऑगस्ट रोजी रायपूर पोलीसांच्या पथकाने करंजी येथे जाऊन आरोपी अखिल सुभान घनकर(२६) याच्या ताब्यातून पिडीत मुलीची सुटका केली. आरोपीला अटक करून रायपूर येथे आणण्यात आले. पिडीत मुलीने लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितल्याने वैद्यकीय तपासणीनंतर या प्रकरणात बाललैंगिक अत्याचाराचे कलम समाविष्ट करण्यात आले. आरोपी घनकर याला आज,१६ ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले.