धक्कादायक! पुन्हा एका चिमुकल्याचे किडनॅपिंग? शाळेत गेला, पण परतला नाही ! शेगाव तालुक्यात १४ वर्षीय चिमुकला बेपत्ता..
Jul 24, 2024, 10:43 IST
शेगाव (संतोष देठे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दोन दिवसापूर्वी चिखली तालुक्यातील आंबाशी येथील १० वर्षीय चिमुकल्याचे अपहरण होऊन त्याचा खून झाल्याची बातमी ताजी असतानाच शेगाव तालुक्यातून आणखी धक्कादायक बातमी समोर आली आहे.शेगाव तालुक्यातील नागझरी येथील १४ वर्षीय मुलगा कालपासून बेपत्ता झाला आहे.
कृष्णा राजेश्वर कराळे असे मुलाचे नाव असून मंगळवारी सकाळी १० वाजता तो शाळेत गेला होता. शाळा संपल्यावर देखील, भरपूर वेळ उलटून गेला. तरी कृष्णा घरी परतला नाही. यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. गावात, शाळा परिसरात खूप शोधूनही कृष्णा मिळाला नाही. आज २४ जुलैच्या सकाळपर्यंत कृष्णाचा काहीच पत्ता लागलेला नाही. तो शेगाव येथील बुरुकुले विद्यालयात वर्ग आठवीमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे कुटुंबीय चिंतेत असून ठिकठिकाणी त्याचा शोध सुरू आहे. कुणाला आढळल्यास त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन कृष्णाच्या नातेवाईकांनी केले.
7499924732
8459802317
9307655172
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अल्पवयीन मुलांचे बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या. आपल्या मुलांवर देखरेख ठेवून, काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे असे आवाहनही पोलिसांनी केले होते.