धक्कादायक! इंस्टाग्राम वर पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच स्टेटस ठेवलं..! दोन विद्यार्थ्यांना अटक

 
Insta
मुंबई(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाचे स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून दोन महाविद्यालयीन तरुणांना पोलिसांनी अटक केली. मुंबईतील कुलाबा भागातून या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. एका व्यवसायिकाने याप्रकरणाची तक्रार केली होती.
प्राप्त माहितीनुसार कुलाबा भागातील एका व्यावसायिकाने सोमवारी पोलिसांची संपर्क साधला. परिसरातील काही मुलांनी पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाचे स्टेटस ठेवल्याचे त्याने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. तक्रारीच्या आधारे दहशतवाद विरोधी पथकाने त्या तरुणांचा शोध घेतला. दोन तरुणांना याप्रकरणी अटक करण्यात आली एकाचे वय १९ तर एकाचे २० असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
 पोलिसांनी तरुणांचे मोबाईल तपासले असता इंस्टाग्राम स्टोरीवर पाकिस्तानच्या स्वतंत्र दिनाचे स्टेटस ठेवल्याचे निदर्शनास आले. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे हेतूनच तरुणांनी हे स्टेटस ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.