धक्कादायक! चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन विद्यार्थिनींना बोलवत होता, शिक्षकाने हटकल्यावर शिक्षकालाच केली मारहाण ! खामगावच्या न.प.उर्दू शाळेतील घटना

 
Khamgo
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींना चॉकलेटचे अमिष दाखवून स्वतःकडे बोलवत होता, तितक्यात शाळेतील शिक्षकाने हटकल्यावर शिक्षकाला शिवीगाळ, मारहाण, जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना खमगाव शहरात उघडकीस आली आहे.
झाले असे की, खमगावच्या गवळीपूरा भागातील नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक २ येथील शाळेच्या प्रांगणात ३० ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान शाळेतील तीन अल्पवयीन विद्यार्थीनी खेळत होत्या. यावेळी शेख इरफान शेख उस्मान कुरेशी, शेख हकीम शेख उस्मान कुरेशी (रा जुनाफैला ,खामगाव) हे दोघे त्या अल्पवयीन विद्यार्थिनींना चॉकलेटचे अमिष दाखवून स्वतःकडे बोलवत होते. यावेळी शाळेचे शिक्षक मोहम्मद उस्मान अब्दुल रहीम (रा.मस्तान चौक , खामगाव) यांनी त्या दोघांना हटकल्यावर त्यांनी शिक्षक मोहम्मद यांना अश्लील शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. शिक्षक मोहम्मद यांनी तशी तक्रार पोलिसात दिली आहे. पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले असुन पुढील तपास हे कॉ रामसिंग राजपूत करीत आहेत.