धक्कादायक! कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी पुत्राची आत्महत्या!

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) चिखली तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून मेरा बुद्रुक येथील शेतकरी पुत्राने आत्महत्या केली. काल ११ ऑगस्टच्या सायंकाळी ही घटना उघडकीस आली. 
Bhutekar
 Advt 👆
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन उद्धव चेके (२८ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याचे वडील उद्धव चेके हे अल्पभूधारक शेतकरी असून, नापिकी व त्यांच्यावरील कर्जाच्या बोजामुळे गजानन नेहमी चिंतेत असायचा. घरात अठरा विश्व दारिद्र आणि वडिलांवरील बँकेचे कर्ज यांची चिंता त्याला सतत सतावत होती. दरम्यान, ११ ऑगस्ट रोजी घरी कोणी नसताना गळफास लावून गजानन याने स्वतःला संपविले. घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. मेरा बुद्रुकचे गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला माहिती दिली. यावरून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.