धक्कादायक! पिक विमा साठी शेतकरी आक्रमक; स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न; मलकापुरातील घटना

 
मलकापूर(स्वप्निल अकोटकार:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पिक विमा प्रश्न शेतकरी आक्रमक झाले आहेत. मागील वर्षीच्या खरीप हंगामाचा पिक विमा अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. दरम्यान मलकापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने पेट्रोल अंगावर घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. काल,१६ ऑगस्टच्या दुपारी ही घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार मलकापूर तालुक्यातील वागोडा येथील शेतकरी स्वप्निल लोड यांचा पीक विमा अद्याप जमा झालेला नाही.त्यामुळे स्वप्निल लोड यांनी मलकापूर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. व्हेज पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.