धक्कादायक! आग्यामोहळाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; मोताळा तालुक्यातील घटना

 
hjtff
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आग्यामोहळाच्या मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोताळा तालुक्यातील रिधोरा गावात आज, १७ नोव्हेंबरला ही घटना घडली.
 

सुरेश कळमकर असे शेतकऱ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार सुरेश कळमकर यांचा हेअर सलून चा व्यवसाय आहे, त्यांची रिधोरा येथे शेती आहे. आज, १७ नोव्हेंबरच्या सकाळी ते शेतात जात असताना आग्यामोहळाच्या मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. हजारो मधमाशांनी डंख केल्याने सुरेश कळमकर यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.