धक्कादायक! बुलडाण्यात गायकवाड कुटुंबातील ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल! पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला जातांनाही मारले; वाचा नेमके काय आहे प्रकरण...

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरातील अण्णाभाऊ साठे नगरात काल ,२१ नोव्हेंबरच्या सायंकाळी राडा झाला. एकाच कुटुंबातील ७ जणांनी माय लेकिंना लाता - बूक्यांनी बेदम मारहाण केली, मुलीचा वाईट उद्देशाने हात धरून तिचा विनयभंग देखील करण्यात आला.  

 या संदर्भात फिर्यादीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शुभम गायकवाड, पूजा गायकवाड, सपना गायकवाड, मनीष गायकवाड, अपर्णा गायकवाड, संध्याबाई, उषा गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत. पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार २१ नोव्हेंबर रोजी आरोपी शुभम गायकवाड यांने तक्रारदार महिलेच्या मुलींसोबत वाद घालून मारहाण केली. याबाबत विचारणा करण्यासाठी तक्रारदार महिला गेली असता आरोपींनी तिच्याही अंगावर धाव घेतली, व शिवीगाळ करून मारहाण केली . त्यानंतर महिला पोलीस ठाण्यात येत असताना वरील सात आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मुलींला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. वाईट उद्देशाने महिलेच्या मुलीचा हात पकडल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.आरोपींवर कलम ३५४,१४३,२९४,१४९,३२३भा. द. वी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश कानडजे करीत आहेत.