धक्कादायक! निंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; शेगाव शिवारातील घटना..

 
Crime
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शेगाव तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोलखेड शिवारातील शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.  
   प्राप्त माहितीनुसार, काल, २४ एप्रिल बुधवारी गोलखेड येथील पंडित साहेबराव सोनोने यांनी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, गौलखेड येथील रहिवासी भारत प्रल्हाद भोदडे (५५ वर्ष) यांनी शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अशा माहितीवरून पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. प्रकरणाची प्राथमिक चौकशी पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे करत असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अनिल बरींगे करत आहेत.