धक्कादायक! बँक मॅनेजरची आत्महत्या; बुलडाणा अर्बनच्या दुसरबिड शाखेत होते कार्यरत; आत्महत्येचे कारण...
May 14, 2023, 16:48 IST

सिंदखेडराजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा अर्बनच्या दुसरबिड शाखेत बँक मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या बँक मॅनेजरने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज,१४ मे रोजी ही घटना उघडकीस आली. अनिल धोंडोजी सांगळे (५० रा. जागदरी, ता. सिंदखेडराजा) असे आत्महत्या करणाऱ्या बँक मॅनेजरचे नाव आहे.
आज रविवारी सुट्टी असल्याने श्री. सांगळे हे जागदरी येथे गावातून फिरून शेतात चक्कर मारायला गेले होते. बराच वेळ होऊनही ते शेतातून परत आले नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा सोनू शेतात मोटार पंप सुरू करण्यासाठी गेला असता त्यावेळी वडिलांचा मृतदेह त्याला फार्म हाऊस वर गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. चार वर्षांपूर्वी सांगळे यांच्या पत्नीचे निधन झाल्याने त्यांनी दुसरे लग्न केले होते. कौटुंबिक वादातून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.