धक्कादायक! डोळ्यात मिरची पावडर टाकून साडेतीन लाख रूपये असलेली बॅग लंपास; बोलेरो अडवून मोटारसायलस्वारांनी केला कार्यक्रम; नांदुऱ्याची घटना..

 
नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):दुकानाची वसुली करुन बोलेरोने येणाऱ्या दोघांना वाटेत अडवून ३ लाख २८ हजार रुपये लुटल्याची घटना बुधवारी रात्री येरळी पुलानजीक घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
मलकापूरातील ओम ट्रेडींग कंपनी या दुकानावर काम करणारे राजू हरी गव्हाळे (४३) व अंशु जावळेकर हे दोघे काल रात्री दुकानाची उधारी वसुल करुन बोलेरो (क्र. एमएच २८ एबी ४८७०) ने नांदुऱ्याकडे येत होते. दरम्यान, येरळी पुलाजवळ दुचाकीवर आलेल्या अज्ञात तिघांनी सदर बोलेरो अडविली व गव्हाळे आणि जावळेकर यांच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून त्यांच्या जवळून ३ लाख ७८ हजार रुपये असलेली बॅग लंपास केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत राजू गव्हाळे यांनी नांदुरा पोस्टेला तक्रार दिली असून पोलिसांनी या प्रकरणी तीन अज्ञात चोरट्यांविरुध्द कलम ३९४, ३४९ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला आहे.