धक्कादायक! विषारी औषध पाजून कोथळीत एकाला जिवे मारण्याच्या प्रयत्न; पाच जणांविरुद्ध गुन्हा!

 
 Bbjj
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मोताळा तालुक्यातील कोथळी येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतीच्या वादातून मारहाण करत विषारी औषध तोंडात टाकून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार काल ४ एप्रिलला उघडकीस आला. याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोथळी येथील गुलाब शाह आलम शाह यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गावातीलच बानो बी आलम शाह, मुस्ताफ शाह आलम शाह, लुकमान शाह उस्मान शाह, आरिफ शाह हुसेन शाह, व हुसेन शाह मलंग शाह हे सर्व त्यांचे नातेवाईक आहेत. फिर्यादी गुलाम शाह यांचा त्यांच्याशी शेतीच्या वाटणीचा वाद आहे.
गुरूवार, ४ एप्रिल रोजी दुपारी बानो बी मुस्ताक शाह आणि लुकमान शाह हे त्यांच्या घरासमोर आले आणि शेती विकण्यासाठी सह्या करा असे सांगितले. परंतु सह्या करण्यास नकार दिल्याने त्यांनी भांडण सुरू केले. तसेच लोटपाट करून जिवे मारण्याची धमकी दिली. इतकचं नाही तर तोंडात विषारी औषध टाकण्याचा प्रयत्न केला. काही औषध तोंडात पडल्याने गुलाब शाह यांची प्रकृती बिघडली. असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पाच जण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास बोराखेडी पोलीस करत आहेत.