धक्कादायक! दिवसाढवळ्या बँक कर्मचाऱ्याला लुटण्याचा प्रयन्त; डोळ्यात मिरचीपावडर टाकली! ९ लाखांची रोकड स्टेट बँकेत टाकायला जात होते! खामगाव शहराच्या किसननगर भागातील घटना..!

 
fhg

खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) चक्क दिवसाढवळ्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटण्याचा प्रयन्त खामगाव शहरातील किसन नगर भागात झाला आहे. 

झाले असे की,खामगाव शहरातील किसन नगर भागात क्रेडिट अँक्ससेस बँक ची शाखा आहे.यामध्ये नितीन देविदास काकडे (वय २७ वर्षे) या शाखेचे कर्मचारी आहेत. काकडे हे १५ जून रोजी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान बँक मध्ये जमा झालेली (रक्कम ९ लाख १ हजार रुपये) हे काकडे स्टेट बँक मध्ये जमा करण्यासाठी त्यांच्या मोटारसायकलने जात होते.याच वेळी बँक पासून ५०० मी च्या अंतरावर दोन अज्ञातांनी त्यांना हात दाखवून थांबवले,काकडे यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांच्याकडे असलेली ९ लाख रूपयाची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयन्त केला होता. या धक्काबुक्की मध्ये काकडे आपल्या मोटारसायकलवरून खाली पडले तरीही काकडे यांनी त्यांच्या हातातील बॅग सोडली नाही. उलट जोरजोरात आरडाओरडा केला. यामुळे परिसरातील लोक गोळा व्हायला सुरुवात झाली आणि त्या दोन अज्ञात चोरट्यांनी तिथून मोटरसायकलने पळ काढला. अशी तक्रार नितीन देविदास काकडे यांनी काल शिवाजीनगर पोलिसात दिली आहे. पोलिसांनी काकडे यांच्या तक्राररीवरून दोन अज्ञात भाम विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.