धक्कादायक! उकळत्या दुधाच्या कढईत पडली चिमुकली; मृत्यूशी झुंज अपयशी! जीव गमावला! मलकापूरची घटना

 
milk

मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): उकळत्या दुधाच्या कढईत चिमुकली पडली. अंगाची प्रचंड लाहीलाही झाली असेल तिच्या. कुटुंबीयांनी उपचारही केले मात्र तिने उपचारांना प्रतिसाद दिला नाही, अखेर तिचा मृत्यू झाला. मलकापूरातील जाधववाडी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. ओमश्री युवराज जाधव(६) असे त्या दुर्दैवी चिमुकलीचे नाव आहे.

मलकापूर शहरातील हनुमान चौकात ओमश्रीचे वडील युवराज जाधव यांची डेअरी आहे. ते कुटुंबासह नांदुरा रोडवरील जाधववाडी परिसरात वास्तव्यास आहेत.  त्यांच्या घरासमोरील आवारात नेहमीप्रमाणे मोठ्या कढईत दूध उकळण्यासाठी ठेवले होते. घटनेच्या दिवशी ओमश्री भावंडासोबत खेळत खेळता अनावधानाने दुधाच्या कढईत पडली. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच तिला तात्काळ बाहेर काढून उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवले. तिथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी तिला जळगाव (खान्देश) येथे नेण्यात आले. मात्र ओमश्री ची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने मुंबईत नेण्यात आले. तिथे तिच्यावर एकापाठोपाठ शस्त्रक्रिया करण्यात आल्या, शेवटपर्यंत तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर ३ आठवड्याच्या उपचारानंतर तिचा मृत्यूशी सुरू असलेला संघर्ष संपला आणि काल,सकाळी तिचे निधन झाले. या घटनेमुळे मलकापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.