Amazon Ad

धक्कादायक! कर्जबाजारी ५० वर्षीय शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले! चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील घटना..

 
चिखली(ऋषी भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) चिखली तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेळगाव आटोळ येथील ५० वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. १९ जुलै, शुक्रवार रोजी ही घटना घडली. 
 प्राप्त माहितीनुसार, रामहरी भिकाजी अंभोरे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. अंभोरे यांचे ८९ हजार हजार रुपये कर्ज थकीत होते. शिवाय, शेतीसाठी त्यांनी इतर खाजगी पतसंस्थेतून कर्ज काढले होते. कर्जाचा बोजा वाढत गेला पण पाहिजे तसे उत्पन्न मिळाले नाही. रामहरी अंभोरे हे गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक संकटाशी झुंज देत होते. दरम्यान, काल शुक्रवारी आर्थिक विवंचनेतून अंभोरे यांनी टोकाचे पाऊल उचलले. विषारी औषध प्राशन करून त्यांनी स्वतःला संपविले. घरातील कर्ता पुरुष असल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती. त्यांना दोन मुले, वृद्ध आई आणि पत्नी असा आप्त परिवार आहे. अंभोरे यांच्या निधनामुळे संपूर्ण शेळगाव आटोळ परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.