धक्कादायक! फेब्रुवारीच्या २२ दिवसांत जिल्ह्यातून १८ ते ३० वयोगटातील ३६ जणी गायब! "व्हॅलेंटाईन वीक" मध्ये ८ जणींनी सोडले घर! ८ तरुणही गेले निघून! बघा कुणी ओळखीचं दिसतय का?

तुम्हाला दिसले असतील पोलिसांना सांगा..

 
yuyuf
बुलडाणा(राहुल रिंढे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दरवर्षी दिवाळी आटोपून लगीनसराई सुरू झाली की लग्नाळू मुले - मुली बेपत्ता होण्याच्या घटना मोठ्या संख्येने वाढतात. बुलडाणा जिल्हा तर यात आघाडीवर आहे की काय असे एकंदरीत चित्र आहे. जिल्ह्यातून प्रत्येक दिवशी कुठल्या ना कुठल्या पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद असतेच. फेब्रुवारी २०२३ च्या पहिल्या २२ दिवसांत आतापर्यंत ३६ तरुणीं गायब झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

१ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी या २२ दिवसांत १८ ते ३० वयोगटातील ३६ जणी गायब झाल्या आहेत. याच वयोगटातील ९ तरुण सुद्धा बेपत्ता झाले आहेत. गायब झालेल्या ३६ पैकी बहुतांश तरुणी या अविवाहित आहेत तर काही लग्न झालेल्या तरुणी सुद्धा गायब आहेत. जया पंढरी येंडाईत (१९) ही चिखली तालुक्यातील येवता येथून १७ फेब्रुवारीला गायब झाली.

रेखा गजेंद्रसिंह राजपूत(२६) ही निंबारी ता.मलकापूर येथून , स्नेहा प्रशांत काठोळे (१८) शेगावतून, प्रगती तेजराव सातव (१९) पळशी सुपो येथून, शुद्धमती संजय सोलाट (१८) कळमेश्वर येथून, रुपाली गजानन  डोंगरे(२२) जवळा येथून बेपत्ता झाल्या आहेत. यांच्यासह इतरही मुली गायब आहेत, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात तशा नोंदी आहेत.