धक्कादायक! जिल्ह्यात ५ दिवसांत २५ गायब; खंडाळ्याची किरण, देऊळगावराजाची वंशिका, देऊळगावमहीची प्रतीक्षा, किन्होळ्याची अनिशा झाली गायब, कंबरखेडचा शिवदासही बेपत्ता

 
Hdhd
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात बेपत्ता होण्याचे सत्र थांबत नाहीये. असा एकही दिवस जात नाही ज्यादिवशी कुणी बेपत्ता होत नाही. अलीकडच्या जून महिन्यातील ५ दिवसांत जिल्ह्यातून २५ जण बेपत्ता झाले आहेत. यात अविवाहित तरुणी, विवाहिता आणि  अविवाहित तरुणांसह पुरुषांचा देखील समावेश आहे. जिल्ह्यात सरासरी दिवसाला ५ जण बेपत्ता होत असल्याची आकडेवारी चिंताजनक आहे.

जिल्ह्यात ११ ते १५ जून या कालावधीत २५ जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यात १५ मुली/ महिला आणि १० पुरुषांचा समावेश आहे. यातील बहुतांश मुली आणि तरुण अविवाहित आहेत तर काही लग्नानंतर देखील बेपत्ता झाले आहेत.

 बुलडाणा तालुक्यातील खंडाळा येथील किरण सूरज काळे (२०), देऊळगावराजा येथील वंशिका अन्ना तारू (२१), देऊळगाव मही येथील प्रतीक्षा समाधान कऱ्हाळे (१८), मोताळा तालुक्यातील किन्होळ्याची अनिशा दादाराव सुरडकर(१८), मलकापूर येथील हरप्रित कौर गुरूजंटसिंग (१९), जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील साक्षी स्वप्नील तायडे(१९), नांदुरा तालुक्यातील नायगाव येथील सौ.सीमा ज्ञानेश्वर नेहरकर(३३), पिंपळगाव राजा येथील दीक्षा प्रशांत सूर्यवंशी(२४), वर्दडी ता. सिंदखेडराजा येथून सौ.किरण बालू इनकर (२९), संग्रामपूर तालुक्यातील लाडणापुर येथून सौ.पूजा आशिष जयस्वाल (२८), तामगाव येथून कु कांचन संजय तायडे(२०), मलकापूर येथून राधा मंगल जगताप(२२), शेगाव येथून उषा रमेश पंडित(२७) गुळभेली येथून तनवी अर्जुन पवार(१९) आणि देऊळगाव राजा तालुक्यातील गारगुंडी येथून सौ इंदुबाई राजेंद्र मांटे (४०) आपल्या मुलासह गायब झाली आहे.

१०  पुरुष बेपत्ता..

गौतम धोंडू खरात (४०)मोंढळा , दीपक बन्सीलाल गजभिये(३०) शेगाव, सूरज ताराचंद पवार(२३) बुलडाणा, साहेबराव रामदास गोळे (३५) नांदुरा,शिवदास संतोष धोंडगे (२०) कंबरखेड,ता मेहकर, महादेव पांडुरंग तायडे (६५) अलमपुर,ता नांदुरा, अमोल मिलिंद काळे (३०) रुम्हणा,योगेश मानसिंग गुळवे(३२) येळगाव आणि अमोल राजेंद्र तायडे(२१) निमगाव ता.नांदुरा हे तरुण बेपत्ता झाले आहेत.