धक्कादायक! १४ वर्षीय सानिकाने टोकाचा निर्णय घेतला! असं तिच्यासोबत काय घडल? खामगाव शहरातील घटना...

 
खामगाव
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन विद्यार्थ्यांनीने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सोमवार, १ एप्रिल रोजी घडली.
कु सानिका निलेश वरूडकर (१४) रा.तायडे कॉलनी, खामगाव असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. सानिका ही खामगावच्या नॅशनल हायस्कूल मध्ये आठव्या वर्गात शिकत होती. आज १ एप्रिल रोजी शाळेत पहिला पेपर देवून ती दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरी आली होती. सानिकाचा लहान भाऊ शेजारी गेला होता. याचवेळी सानिकाने घराचा दरवाजा आतून बंद करून स्वतःला गळफास लावून घेतला. थोड्या वेळाने तिचा लहान भाऊ शेजारून घरी आला, त्याने दरवाजा वाजवून बघितला मात्र आतून आवाज येत नसल्याने शेवटी तिच्या नातेवाईकांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यानंतर सानिका ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. खामगावच्या सामान्य रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले आहे. नेमके सानिकाने कोणत्या कारणाने आत्महत्या केली. याचे कारण कळू शकले नाही.