धक्कादायक! जिल्ह्यात बलात्काराची शंभरी ! इश्कातून बलात्काराच्या घटना अधिक! चिमुकल्या लेकिंचीही अब्रु धोक्यात

 
Dhbvb
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात वर्षभरात गुन्हेगारीच्या अनेक घटना घडल्यात..बहुतांश घटनांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले..मात्र चिंतेची बाब म्हणजे जिल्ह्यात बलात्काराच्या घटना वाढत आहे..२०२२ मध्ये देखील बलात्काराच्या घटना शंभरीपार पोहचल्या होत्या, यंदाही तीच गत असून यंदा बलात्काराच्या घटनांनी शंभरी ओलांडली आहे..
  बुलडाणा जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या सायबर पोलीस स्टेशनसह एकूण ३४ पोलीस ठाणे आहेत. यातील ३३ पोलीस ठाण्यांत बलात्काराची प्रकरणे दाखल आहे. नोव्हेंबर २०२३ अखेर पर्यंत जिल्ह्यात ९७ बलात्काराच्या घटनांची नोंद होती, चालू महिन्यात हा आकडा शंभरीपार पोहचला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
आधी इश्क ब्रेकअप झाला की बलात्कार...
दरम्यान कागदावर ही आकडेवारी मोठी वाटत असली तरी यातील बहुतांश प्रकरणे ही किचकट स्वरूपाची आहेत. आधी प्रेम, नंतर सहमतीने शारीरिक संबंध मात्र त्यानंतर काही कारणाने ब्रेक अप झाले तर आधी सहमतीने झालेल्या शारीरिक संबंधांना बलात्कार म्हणत तक्रारी देण्यात आल्याची उदाहरणे अधिक आहेत. काही प्रकरणे मात्र अतिशय गंभीर स्वरूपाची आहेत. वासनेच्या भुकेपोटी नात्यातील लोकांनीच चिमुकल्या लेकींची अब्रू लुटल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत..चिखली तालुक्यातील रोहडा येथील येथील घटनेत ८ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता, जिल्हा हादरवून सोडणारी ती घटना होती.
विनयभंगाच्या घटनाही भरपूर...
बलात्काराच्या घटनांसोबतच वियभांगाच्या घटना देखील वाढल्या आहेत. नोव्हेंबर अखेर पर्यंत ३५३ घटनांची नोंद होती.चालू महिन्यात हा आकडा ३६० पार पोहचला आहे. वाईट उद्देशाने स्पर्श करणे, डोळा मारणे, अश्लील बोलणे अशा बाबींचा विनयभंग या प्रकारात समावेश होतो...