शिरसगाव देशमुखच्या शेरखान ने केले कांड! म्हणाला, मी महिन्याला २ हजार बिल भरतो, बाकीच्यांचे आकोडे नाही दिसत का? वाचा काय आहे प्रकरण....
Updated: Jan 3, 2024, 17:40 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)
खामगाव तालुक्यातील शिरजगाव देशमुख येथे काल, २ जानेवारीला विज वाहिनीचे निरीक्षण करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी आले होते. मात्र गावातील चार जणांनी त्या कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चौघांवर खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खामगांव महावितरण येथील वरिष्ठ तंत्रज्ञ चिरंजीलाल जाधव सहकाऱ्यासह वीज निरक्षणासाठी गावात आले होते.दरम्यान पथक गावातील जनता नगरात आले, त्यावेळी गावातील शेरखान नावाचा व्यक्ती काठी घेऊन आला. व महावितरणच्या कर्मचाऱ्याशी वाद घालने त्याने सुरू केले. वादामागचे कारण अध्याप कळू शकले नाही, मात्र व्हायरल व्हिडिओतून. मी दर महिन्याला २ हजार बिल भरून राहलो, कितिकांनी आकोडे टाकले, ते नाही ना दिसत? असं शेरखान म्हणत आहेत. यामध्ये त्याने अश्लील शिवीगाळ केली. त्याचे सोबतचे इतर तिघांनी देखील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे सुरू केले. याप्रकरणी चिरंजीलाल जाधव यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.