नवा ड्रेस घालून कॉलेजला गेली अन् गायब झाली...

खामगाव तालुक्यातील घटना
 
खामगाव शहरातून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; कॉम्‍प्‍युटर क्लासला गेली होती…
खामगाव  (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नवा ड्रेस घालून कॉलेजला गेलेली १७ वर्षीय मुलगी गायब झाली. ही घटना खामगाव तालुक्यातील पळशी बुद्रूक येथे घडली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वडिलांनी एका तरुणावर संशय व्यक्त केला असून, मुलीच्या मामाच्या साल्याने मुलीला पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पळशी बुद्रूक (ता. खामगाव) येथील १७ वर्षीय मुलगी आई, वडील, लहान भाऊ व बहिणीसह राहते. ६ जानेवारी रोजी सकाळी कॉलेजला जाते, असे सांगून ती गेली होती. मात्र त्यादिवशी नेहमीप्रमाणे कॉलेजचा ड्रेस न घालता तिने नवा ड्रेस घातला होता असे वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मात्र संध्याकाळ होऊनही ती घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली असता ती आज कॉलेजला आलीच नव्हती असे सांगण्यात आली.

आई- वडिलांनी नातेवाईकांकडे तसेच मित्र- मैत्रिणी सर्वांकडे शोध घेऊनही ती मिळून आली नाही. त्यामुळे वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दिवाळीच्या दरम्यान मुलीच्या मामाचा साला राहुल ज्ञानदेव घाटोळ (रा. ओसलकार मळा, शेगाव) याच्याशी मुलीचे बोलणे झाले होते. त्यानंतर दोघे फोनवर सुद्धा बोलत होते. त्यामुळे राहुलनेच मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी दिली. पोलिसांनी राहुल विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.