तिला "त्या" कामासाठीच आणले होते तिथे!राजुर घाटात करणार होता मोठे कांड! पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले अजमा चे प्राण! वाचा नेमक घडल तरी काय...?

 
Jxjnx
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहराला लागून असलेल्या मलकापूर रोडवरील राजूर घाटात परवाला म्हणजेच २३ ऑक्टोबरला मोठे कांड होता होता वाचले. एक संशयी नवरा बायकोला गळा आवळून खून करण्याच्या प्रयत्नात होता, त्याने त्या कामासाठीच तिला तिथे आणले होते. मात्र जवळच असलेल्या शहर पोलिसांच्या पोलीस चौकीवरील होमगार्ड सैनिकांच्या कानावर तिचा आवाज आला, सैनिक धावत तिथे गेले, त्याच्या तावडीतून तिला सोडवले अन् तीचे प्राण वाचले..!
 बुलडाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी काल,२४ ऑक्टोबरला पत्रकार परिषदेत या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. अजमा (३०, रा.अकोला) हीचे याआधी एक लग्न झाले होते. आधीच्या पतीपासून तिला २ मुले आहेत. आधीच्या पतीशी घटस्फोट झाल्यानंतर अकोल्याच्या शेख इब्राहिम शेख चांद याच्याशी लग्न झाले. मात्र तो देखील सातत्याने तिच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेत होता.
यातूनच त्याने तिला फारकती देण्याचे ठरवले. २३ ला दुपारी तो बायको पोरांना घेऊन बाळापुरात आला. तिथे २ मुलांना नातेवाईकांच्या घरी ठेवले. त्यानंतर तिथून अजमाला घेऊन तो बुलडाण्याला आला. फारकतीची कागदपत्रे आणायची आहेत, मस्जिद मध्ये जायचे असे इब्राहिम ने अजमाला सांगितले. इब्राहीमने बुलडाण्यातून अजमा ला राजूर घाटात नेले. देवी पॉइंट जवळ दुचाकी थांबवली. त्यानंतर थोडे जंगलात जात तिथे अजमाचा गळा आवळला. तिचे डोके दगडावर आपटले. यावेळी तिच्या ओरडण्याचा आवाज जवळ असलेल्या पोलीस चौकीवरील होमगार्ड सोमनाथ वानरे आणि शुभम शेळके यांनी ऐकला. त्यांनी तातडीने आवाजाच्या दिशेने धाव घेतली. अजमा चा खून करून पुरावा नष्ट करण्याचा इब्राहिम चा प्लॅन होता. मात्र बुलडाणा शहर पोलिसांच्या होमगार्डच्या सतरकने अजमा चे प्राण वाचले. बुलडाणा शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून आरोपी इब्राहिम ला अटक केली. अजमावर उपचार करण्यात आले. अजमाच्या तक्रारीवरून तिच्या संशयी नवऱ्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
म्हणून लावण्यात आली चौकी..!
दोन महिन्यांपूर्वी राजूर घाटात कथित सामूहिक बलात्काराचा प्रकार समोर आला होता. निर्मनुष्य परिसर असल्याने राजूर घाटात सातत्याने गुन्हे घडत असल्याची बाब देखील पोलिसांच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी राजूर घाटात पोलीस चौकी सुरू करण्याचे आदेश दिले होते..आता या चौकीमुळेच अजमा चे प्राण वाचले आहेत...!