'ती' मुलांना कोचिंग क्लासला घेवून गेली; अन इकडे चोरट्यांनी घरात 'क्लास' घेतला..!खामगाव शहरातील घटना..!

 
Bzbxb
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुलांना कोचिंग क्लासला घेऊन गेल्याची संधी साधून चोरट्यांनी घराची कडी उघडून आत प्रवेश केला.लोखंडी कपाटात ठेवलेले नगदी व सोन्या चांदीवर डल्ला मारल्याची घटना खामगाव शहरात घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार प्रवीण केशवराव तायडे (३२,रा.कारंजा रम ता - बाळापूर जिल्हा अकोला,ह मु.वाडी ,खामगाव) यांच्या पत्नी २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या दरम्यान त्यांच्या घराला कडी लावून मुलांना कोचिंग क्लासला घेऊन गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत कोणत्यातरी अज्ञात चोट्याने घराची कडी उघडून घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटात ठेवलेले नगदी ८१०० रुपये,कपाटात ठेवलेला सोन्याच्या चपलाहार वजन २१ ग्राम ९०० मिलिग्रॅम किंमत १ लाख ४२ हजार रुपये असा एकून १ लाख ५० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. आज २४ ऑगस्ट रोजी तशी तक्रार प्रवीण तायडे यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनला दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नापोकॉ प्रदीप मोठे हे करीत आहेत.