रात्री आईजवळ झोपली होती, सकाळी उठून पाहले तर गायब!सावळा रंग, गोल चेहरा, मजबूत बांधा, ५ फूट उंचीच्या मुलीला पळवले;

मुलीच्या वडिलांना मोहन हटोले वर डाऊट, व्हॉटस् अप वर करत होता चॅटिंग; चिखली तालुक्यातील घटना....
 
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. चिखली शहराच्या पूर्वेला १३ किलोमिटर वर असलेल्या गावातून ही बातमी आहे, एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलगी १२ व्या वर्गात शिकणारी असून ती १६ वर्षे ११ महिन्याची आहे. चिखली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
  पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. घटना ३१ जानेवारीच्या रात्री ते १ फेब्रुवारीच्या पहाटेदरम्यान घडली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार ३१ जानेवारीच्या रात्री मुलगी तिच्या आईजवळ झोपली होती.
   दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीचे वडील लघवी करण्यासाठी उठले त्यावेळी त्यांना घराजा दरवाजा उघडा दिसला. मुलगी तिच्या आईजवळ दिसली नाही, त्यामुळे त्यांनी आसपास मुलीचा शोध घेतला, नातेवाईकांना फोन करून विचारणा केली तरी मुलगी मिळाली नाही. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार काही दिवसांआधी मोहन हटोले याने मुलीशी व्हॉट्स ॲपवर चॅटिंग केली होती. त्यामुळे मुलीच्या वडिलांना मोहन हटोले यांच्यावर संशय असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुलीच्या रंग सावळा, चेहरा गोल, मजबूत बांधा, उंची ५ फूट आहे, घटनेच्या दिवशी मुलीच्या रंगाने पांढऱ्या रंगाचे टॉप व लाल निळ्या रंगाचे पट्टे असलेली लॅगीज घातलेली होती.