ती म्हणाली तुला एवढी मोठी बाई दिसत नाही का? मग तिघांनी कारमधून उतरून केले पाप..! नांदुऱ्याची घटना...

 
नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नांदुरा तालुक्यात ३३ वर्षीय विवाहितेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. कारमधून आलेल्या तिघांनी हे कांड केले. विवाहीतेने तशी तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे.
Dada
Advt 👆
३३ वर्षीय विवाहिता ही शेतात जात असताना तिघांनी कारमधून येऊन विवाहितेशी रस्त्यामध्ये अश्लील चाळे करून विनयभंग करून लैंगिक अत्याचार करीत खून करून जीवे मारण्याची धमकी दिली.तालुक्यातील कोकलवाडी-वरखेड शिवारात घडली.
  या प्रकरणी ३३ वर्षीय पीडित महिलेने नांदुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की ती तिचे चुलत सासरे यांच्यासोबत शेतात जात असताना रस्त्यावरून तिच्या जवळून एक पांढऱ्या रंगाची कार जोरात गेली. पावसाळ्याचे दिवस असल्याने डबक्यातील पाणी तिच्या अंगावर उडाल्याने तीने कार चालकाला जोरात आवाज देऊन तुला एवढी मोठी बाई दिसत नाही का? असे म्हटल्याने कारचालक आरोपी रामेश्वर दादाराव भगत हा गाडी थांबून खाली उतरला व विवाहितेला शिवीगाळ करीत तिच्या कानाखाली जोरात चापट मारली. विवाहिता खाली बसली असता त्याने मागून उचलून पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विवाहितेने आरडा-ओरड केली असता गाडीत बसलेले आरोपी योगेश दादाराव भगत व मोहन शंकर भगत हे दोघेही गाडीतून उतरून आले व तिघांनी विवशितेशी अश्लील चाळे केले. हिच्यावर लैंगिक अत्याचार करु व हीचा मर्डर करून टाकू अशी धमकी आरोपींनी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे .या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी वरील तिन्ही आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ११५ (२), ३(५), ३५१ (२) (३) अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले असून पुढील तपास नांदुरा पोलीस करीत आहे.