लाज सोडली! ६ वर्षीच्या चिमुकलीवर ५० वर्षाच्या नराधमाने केला बलात्कार; खाऊ देण्याचे दाखवले आमिष; जळगाव जामोद तालुक्यातील संतापजनक घटना!

 
Ffhj
जळगाव जामोद(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात महिला,मुलींवरील अत्याचाराच्या घटना नवीन नाहीत. मात्र जळगाव जामोद तालुक्यातील एका गावात एक अतिशय धक्कादायक आणि तेवढीच निंदनीय घटना समोर आली आहे. नातीच्या वयाच्या मुलीवर एका ५० वर्षाच्या नराधमाची वाईट नजर पडली अन् त्याने तिच्या इज्जतीचे लचके तोडले.
विठ्ठल समाधान दामोदर(५०) असे नराधम आरोपीचे नाव आहे. पिडीत चिमुकलीच्या आईने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दिली आहे. त्या तक्रारीवरून आरोपी समाधान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
  
  प्राप्त माहितीनुसार जळगाव जामोद तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. आरोपी समाधान याने स्वतःच्या राहत्या घरात मुलीला बोलवून कुकर्म केले. घटनेच्या वेळी मुलीचे कुटुंबिय घरी नव्हते. आरोपी समाधान याने खाऊचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार केला. चिमुकलीने विरोध केला मात्र ५० वर्षाच्या नराधमासमोर तिचे काही चालले नाही. घडलेला प्रकार कुणाला सांगितल्यास जीवाने मारून टाकील अशी धमकी त्याने चिमुकलीला दिली. मात्र चिमुकलीला वेदना होत असल्याने तिने घडला प्रकार तिच्या आईला सांगितला. आईने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.