तिच्यासोबतचा "तसला" फोटो तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवला; पुढे जे होऊ नये तेच झालं! खामगाव तालुक्यातील संभापुरच्या वैभवचा कारनामा..!

 
kraim

खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आधी तीच्यासोबत सेल्फी काढला..जवळीक वाढवली..त्यानंतर चक्क शारीरिक सुखाची मागणी केली.. तिचे लग्न दुसऱ्या एका तरुणाशी ठरल्यावर इंस्टाग्राम वर बनावट खाते उघडून त्यावरून तिच्यासोबतचे आक्षेपार्ह फोटो तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवले..त्यानंतर पुढे होऊ नये तेच झालं..खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली असून पोलिसांनी खामगाव तालुक्यातील संभापुर येथील वैभव कैलाससिंग पवार या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वैभव कैलाससिंग पवार(२५)  याने गेल्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात तक्रारदार तरुणी सोबत सेल्फी घेतला होता. दरम्यान तरुणीने सेल्फी डिलीट करायचे सांगूनही त्याने फोटो डिलीट केले नाही. उलट तिच्याकडे शरिरसुखाची मागणी करून तिच्यासोबत आणखी आक्षेपार्ह फोटो काढले. घडलेली घटना तरुणीने जेव्हा कुटुंबीयांना सांगितली तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. कुटुंबीयांनी वैभवला फोटो डिलीट करण्याचे  सांगितले तेव्हा त्याने फोटो डिलीट करण्याचे मान्य केले मात्र फोटो डिलीट केले नाही. 

  दरम्यान काही दिवसांआधी तरुणीचे दुसऱ्या तरुणाशी लग्न ठरले. ही बाब वैभव पवारला माहीत झाल्यावर त्याने २ डिसेंबरला इंस्टाग्रामवर बनावट खाते उघडले, त्यावरून तरुणीचे आक्षेपार्ह फोटो होणाऱ्या नवऱ्याला पाठवले..त्यामुळे तरुणीचे लग्न मोडले. अखेर तरुणीने वैभव पवार विरुद्ध खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असून त्याला  अटक केली आहे.