खळबळजनक! खामगावच्या भूमी अभिलेख कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न! शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतले, पुढे...

 
People
खामगांव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगावात आज २९ जानेवारीच्या दुपारी भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. हे दृश्य पाहताच परिसरातील लोकांनी वेळीच त्या शेतकऱ्याला रोखले. पुढे घटनास्थळी पोलीस पोहचले व त्यांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतले. या घटनेने संपूर्ण कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली होती. 
 ज्ञानेश्वर पांडुरंग लांडे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते खामगाव तालुक्यातील आवार येथे राहतात. सरकारी जमीन मोजणीत त्यांनी हरकत अर्ज दाखल केला होता. मात्र अद्यापही भूमी अभिलेख कार्यालयाने दखल घेतली नाही असा त्यांचा आरोप आहे. पिंपळीगवळी येथे गट क्र.२९० मध्ये सरकारी जमीन मोजणीत त्यांची १० फूट रुंद, ८० फूट लांब शेती जात असल्यामुळे शहानिशा करून न्याय देण्यात यावे अशी मागणी ज्ञानेश्वर लांडे यांनी केली होती.