Amazon Ad

खळबळजनक! नांदुरा पंचायत समिती मधील इंजिनीयर खादाड निघाला ; २ हजाराची लाच स्विकारताना एसीबीने रंगेहात पकडले..

 
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) कारवाईचा धुमधडाका लावलेल्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (बुलडाणा )आज १६ जुलै, मंगळवारी नांदुरा पंचायत समितीमध्ये सापळा रचून यशस्वी कामगिरी केली. घरकुलासाठी सादर केलेल्या प्रस्तावाच्या चौकशीचा मोबदला म्हणून नांदुरा पंचायत समिती मध्ये कार्यरत बांधकाम विभागाचे स्थापत्य अधिकारी खेमराज राठोड यांनी २ हजाराची लाच स्वीकारली. बुलडाणा लाच लुच प्रतिबंधक विभागाने खेमराज राठोड याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. राठोड यानी तक्रारदाराच्या आईचा घरकुलाचा प्रस्ताव चौकशीसाठी पाठविला. याचाच मोबदला म्हणून त्यानी तक्रारदाराला २ हजार रुपये अशी लाच मागितली. परंतु लाच देण्याच्या मानसिकतेत नसलेल्या तक्रारदाराने थेट बुलढाणा येथील लाचलुजपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली. यानंतर लाचलुजपत प्रतिबंधक विभागाच्या उपाधीक्षक श्रीमती घोगरे यांनी कारवाईचे सूत्र हलविले. सापळा रचून खादाड खेमराज राठोड याला आज रंगेहात पकडण्यात आले.