खळबळजनक! वडगाव तेजन गावात एकाच रात्री चार ठिकाणी सशस्त्र दरोडा; नवरा - बायकोचे हात पाय बांधले, तोंडात बोळा कोंबला अन् गळ्याला चाकू लावून केला कार्यक्रम..

 
Bxbdb
सुलतानपुर( सतिष तेजनकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वडगाव तेजन येथे ४ सप्टेंबरच्या रात्री चार ठीकाणी चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकून मुद्देमालासह हजारोंचा ऐवज लंपास केल्याने परिसरात चोरट्यांची प्रचंड दहशत पसरली आहे .
Vbn
याबाबत असे की पालखी मार्ग शेगाव - पंढरपूर व सुलतानपुर येथील राज्यमहामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या वडगाव तेजन येथे ४ सप्टेबर च्या मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याच्या टोळीने ग्रामस्थ गाढ झोपेत असल्याचा फायदा घेतला. रस्त्यावर असलेल्या घरावर सशस्त्र हल्ला करीत चोरट्यांनी वयोवृद्ध शेतकरी दांपत्य रामकिसन रामराव तेजनकर (६५)यांच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास प्रवेश करून दोघेही पती-पत्नीला बांधून ठेवत दोघांच्या हि गळ्याला चाकू लावून तोंडात बोळा कोंबून जवळ व घरात असलेले पैसे व दागिने देण्यासाठी दरडावत जिवे मारण्याची धमकी देत डोळ्यादेखत आहे तो मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. त्याच वेळी भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या नारायण तुकाराम कुलाल यांच्या घरी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करीत कॅमेरऱ्याची दिशा बदलून घरामध्ये चोरी केली याच दरम्यान जुन्या ( वडगाव तेजन ) गावांमध्ये राहणाऱ्या विशाल रमेश तेजनकर व इंदुबाई त्रंबक मानवतकर यांच्या घरावर चोरांनी डल्ला मारून सोने व रोख रक्कम पसार केली .
एकाच रात्री एकाच वेळी चोरट्यांणी सशस्त्र हत्यारासह टाकलेल्या दरोडयात ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार रामकिसन रामराव तेजनकर(६९) यांनी लोणार पोलीस स्टेशनला दिली असुन घटनेची माहीती मिळताच लोणार पोलीस स्टेशनचे पो.नि. मिनिश मेहेत्रे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळाची पाहणी केली. उपविभागीय अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता बुलडाण्यावरून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले .सदर घटनेचा तपास अधिकारी लोणार पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घोगरे पोकॉ ज्ञानेश्वर शेळके , रोहीदास जाधव , दराडे , शेळके करीत आहेत .
अवैध व्यवसायामुळे चोरटे सक्रिय?
"लोणार तालुक्यात सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थीती असली तरी मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरु आहेत . जवळच असलेल्या सुलतानपुर येथील अवैध व्यवसाय , अवैध पणे राज्यमहामार्गावार होणारी दारूविक्री हया मुळे सुद्धा अशा घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पोलीस विभागाने याकडे विशेष लक्ष देण्याची गरज सुज्ञ नागरिक बोलुन दाखवित आहेत " .