पहिल्या पत्‍नीची संमती न घेता दुसरे लग्न!

चिखली तालुक्‍यातील घटना
 
विवाहबाह्य संबंधामुळे पतीने मांडला विवाहितेचा छळ; तिच्या देखत फोनवर बोलायचा!
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पहिल्या पत्‍नीची संमती न घेता दुसरे लग्न केले. दुसरीला खोटे सांगितले की पहिली पत्‍नी बाळंतपणाच्या वेळेस वारली. पहिल्या पत्‍नीच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलिसांनी पतीसह १० जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

सौ. सविता गजानन अवसरमोल (रा. जांभोरा, ता. चिखली, ह. मु. सवडद ता. सिंदखेड राजा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. गजानन साहेबराव अवसरमोल, कासाबाई साहेबराव अवसरमोल, गोदावरी महादेव कांबळे, महादेव कांबळे, राधाबाई रमेश सगट, रमेश सगट (सर्व रा. जांभोरा ता. चिखली), वंदनाबाई अंबादास अवसरमोल, ज्ञानेश्वर अंबादास अवसरमोल, वैशाली ज्ञानेश्वर अवसरमोल, मीराबाई गणेश बोरकर (रा. केळवद ता. चिखली) अशी गुन्‍हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

२०१७ मध्ये सविताचे लग्न झाले होते. तिचा एक मुलगी आहे. लग्नानंतर पती व सासरच्यांनी तिला ५-६ महिने चांगले वागवले. नंतर काही दिवसांनी तू आम्हाला पसंत नाही. तुला काेणत्याही प्रकारचा कामधंदा येत नाही. तू अपशकुनी आहे, असे म्‍हणत तुझ्या वडिलांकडून लोडिंग गाडी घेण्यासाठी १ लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी केली. तिने माहेरची परिस्‍थिती चांगली नसल्याने पैसे आणण्यास नकार दिला असता सासरच्यांनी तिला चापटा बुक्‍क्यांनी मारहाण करून शिविगाळ करत घराबाहेर हाकलून दिले. तिची संमती न घेता त्‍यानंतर पतीने दुसरे लग्न केले. दुसरीला पहिली पत्नी बाळंतपणाचे वेळेस मयत झाल्याचे खोटेच सांगितल्याचेही तक्रारीत म्‍हटले आहे. तपास एएसआय अशोक काशीकर करत आहेत.