चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कार्पिओ पलटी!;एक ठार, चार गंभीर, खामगाव तालुक्यातील आज पहाटेची घटना
May 26, 2024, 11:41 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कार्पिओ पलटी होवून एक जण जागीच ठार,तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना खामगाव तालुक्यात आज पहाटे उघडकीस आली आहे.
स्कार्पिओ कार चालकाचे नियंत्रण सुटून, कार पलटी होऊन एक जण जागीच ठार, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी ते बोरी - अडगाव रोडवर आज पहाटे २६ मे रोजी सहा वाजताच्या दरम्यान घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एम एच ३३.ए सी. २३६६ ही स्कार्पिओ गाडी शेगावकडे जात होती.भरधाव वेगामुळे कारचालकाचे गाडीवरील अचानक नियंत्रण सुटल्याने गाडी आंबेटाकळी ते बोरी - अडगाव रोडवर पलटी झाली आहे. स्थानिक नागरिकांना माहिती मिळताच या अपघातातील जखमींना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. या अपघातात देवराव रावजी भंडारकर (५५) रा. गडचिरोली हे जागीच ठार झाले आहेत. यासह गाडीमधील सौ कांता देवराव भंडारकर वय (५०), जयदेव नामदेव नाकाडू (४०), जयश्री राऊत (१६), समृद्धी कोमलवार (६) सर्व रा. तळेगाव ता. कुरखेड, जिल्हा - गडचिरोली हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खामगाव येथील शासकीय सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रथमचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर केले आहे.