दुःखद बातमी! बुलडाणा न्यायालयाच्या कोनशिला समारंभाला जातांना देऊळगावराजा न्यायालयाचे न्यायाधीश श्री शैलेश कुठे यांना हार्टअटॅक!

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा येथील जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचा कोनशिला समारंभ आज ,२४ ऑगस्टला पार पडला. या कार्यक्रमासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मा.न्यायमूर्ती भूषण गवई व मा.न्या. प्रसन्न वराळे बुलडाण्यात आलेले आहेत. शिवाय मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय देखील बुलडाणा शहरात आलेले आहेत. या कार्यक्रमासाठी बुलडाणा येथे येत असताना देऊळगाव राजा न्यायालयाचे न्यायाधीश श्री शैलेश कंठे यांना देऊळगाव मही जवळ हृदयविकाराचा तीव्र झटका आला. देऊळगाव मही येथील एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले, प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी चिखली येथे पाठवले मात्र चिखली येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले...