दुःखद! अखेर पित्यापाठोपाठ भक्तीनेही घेतला अखेरचा श्वास; मेहकर चिखली रस्त्यावर झाला होता अपघात; उपचारासाठी सरसावले होते हजारो हात..

 
Ghhg
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तिच्या उपचारासाठी १५ लाख रुपयांची गरज भासणार होती. मदतीचे आवाहन केल्यानंतर समाजाने पै - पै देणगी देऊन ११ लाख रुपयांची मदतही उभी राहिली होती. छत्रपती संभाजी नगरातील  एशियन हॉस्पिटल मध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र दुर्दैव..उपचाराच्या ११ व्या दिवशी तिचा लढा संपला..आणि भक्तीने प्राणत्याग केला. ही गोष्ट आहे मेहकर तालुक्यातील ब्रह्मपुरीच्या भक्ती गजानन म्हस्के(१३) या चिमुकलीची..१ एप्रिलला नांद्रा धांडे फाट्यावर तिच्या वडिलांनी मोटारसायकल आयशर ला मागून धडकली. त्यात वडील गजानन म्हस्केंचा जागीच मृत्यू झाला होता तर भक्ती गंभीर जखमी झाली होती.
भक्तीवर छत्रपती संभाजी नगरातील एशियन हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. समाजातील हजारो हातांनी भक्तीचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. १५ लाख रुपयांपैकी कालपर्यंत ११ लाख रुपये जमा देखील झाले होते. आणखी काही जमा होणार होती. मात्र भक्तीने उपचारांना साथ दिली नाही. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही भक्तीचे प्राण वाचवता आले नाहीत.अखेर दुर्दैवाने भक्तीचे उपचारादरम्यान निधन झाले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.