दुःखद! ॲड. विजय बाजड यांचे अपघाती निधन; सिलेंडर ची वाहतूक करणाऱ्या ट्रकने चारचाकीला उडवले; चिखली मेहकर रस्त्यावरील माळखेड फाट्यावर झाला अपघात...

 
Ad.Bajad
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर येथील वकील विजय बाजड यांचे आज,१३ मार्चला  अपघाती निधन झाले. चिखली मेहकर रस्त्यावरील माळेगाव फाट्यावर त्यांचा अपघात झाला. मृत्युसमयी त्यांचे वय ४० वर्षे होते. 


 

  Add
                         Add.👆
 प्राप्त माहितीनुसार विजय बाजड यांच्या चारचाकी वाहनाला सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिली. अपघातात वाहनाचा चारचाकी वाहनाचा चेंदामेंदा झाला. साखरखेर्डा पोलिसांनी घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत केली. अपघातानंतर विजय बाजड यांना चिखली येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले,तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातास कारणीभूत ट्रकचालकाविरुद्ध साखरखेर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.