जिल्ह्यातल्या २२ बलात्कार पीडितांना मनोधैर्य योजनेतून ६४ लाखांचे अर्थसहाय्य! ​​​​​​​

 
bvjkdcm

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अत्याचार झालेल्या महिलांना मनोधैर्य योजनेतून आर्थिक सहाय्य केले जाते. गेल्या १५ दिवसात मनोधैर्य योजनेतून २२ पिडीत महिलांना ६४ लाख ५० हजार रूपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे.

लैंगिक अत्याचारातील महिला आणि मुले, तसेच ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या पिडीतांसाठी आर्थिक सहाय्य आणि उद्भवलेल्या प्रसंगातून पिडीतांना सावरण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणातर्फे मनोधैर्य योजनेद्वारे भक्कम पाठिंबा दिला आहे. महिला, मुले यांच्यावरील लैंगिक अत्याचार, तसेच ॲसिड हल्यात जखमी झालेल्या पिडीतांवर ओढवलेल्या प्रसंगामुळे त्या खचून जाऊ नये, यासाठी विधी सेवा प्राधिकरणातर्फे अशा पिडीतांना आर्थिक मदत मनोधैर्य योजने द्वारे देण्यात येते. महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असल्यामुळे पीडितांचे पुनर्वसन करिता शासनातर्फे मनोधैर्य योजनेची अमंलबजावणी करण्यात येते. गेल्या १५ दिवसांमध्ये एकूण २२ पिडीतांना ६४ लाख ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे.

गुन्हा, घटना आणि पारिणामाचे स्वरुप पाहून २ ते १० लाख रुपयांपर्यंत या योजनेद्वारे अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते. अज्ञान बालक, बालिका, लैंगिक शोषित पिडीत यांच्या मानसिकतेवर प्रभाव पडतो, तसेच समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. यामुळेच अशा व्यक्तीचे पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने आर्थिक सहाय्य करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्याकरिता  मनोधैर्य योजना मदतीची ठरते आहे.