साहित्य मंजूर करून देण्यासाठी मागितले १२ हजार, चिखली पंचायत समितीतील खादाड लिपिक एसीबीच्या जाळ्यात; ६ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं!

 
Jhgg
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): योजनेतील  साहित्य मंजूर करून देण्यासाठी ६ रुपयांची लाच स्वीकारताना  चिखली पंचायत समिती मधील समाज कल्याण विभागात कार्यरत रवींद्र भंडारे (५४ वर्ष) या खादाड लिपीकाला  एसीबीने आज गुरुवारी, दुपारी रंगेहाथ पकडले .

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त तक्रारीनुसार चिखली येथे समाज कल्याण विभागात कार्यरत कनिष्ठ सहाय्यक रवींद्र भंडारे याने साहित्य मंजुरात करून देण्यासाठी एकाला १२ हजार रुपयांची मागणी केली होती.

यावरून तक्रारदाराने १५ दिवसांपूर्वी  एक हजार  रुपये दिले. उर्वरित लाचेची मागणी होत असताना, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला. यावरून विभागाने सापळा रचला आणि आज गुरूवारच्या दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास खादाड लिपिक भंडारे याला ६ हजारांची लाच स्वीकारताना त्याच्या कार्यालयात रंगेहाथ पकडले. त्याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.